सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

स्टफ्ड सातू पराठा

सातू  जीरे पूड
ND
साहित्य - सातू 1 वाटी, जीरे पूड, धणे पूड पाव चमचा, तिखट, मीठ, हळद, हिंग अंदाजे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा पाव चमचा, 1 कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची आवडीनुसार वाटून, तेलाचे मोहन 1-2 चमचे.

कृती - सातूच्या पिठात वरील सर्व साहित्य घालून तेलाचे मोहन घाला. कांदा व कोथिंबीर घालून थोडे ओलसर पीठ कालवून घ्या. लहान-लहान आकारात गोळे बनवून ठेवा.

पराठ्यासाठी साहित्य - कणिक 1 वाटी, थोडे मीठ व तेल गाळून भिजवून ठेवा. अर्धा तास मुरू द्या. करताना तेलाचा हात घेऊन मळून घ्या. लहान लहान आकारात लाट्या बवनून पाती लाटून वरील सातूचे मिश्रण भरून पराठा लाटा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून लालसर रंगावर भाजून घ्या. स्टफ्ड पराठा दह्यासोबत खायला द्या.