शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By विकास सिंह|
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (14:46 IST)

महिला दिवस : कोरोना काळात बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी हिराबुआ, वाचून अश्रू थांबणार नाहीत

आंतरराष्ट्रीय महिला दिनावर ‘वेबदुनिया’आपल्याला समाजातील त्या महिलांशी भेट करवून देत आहे ज्या न केवळ जागतिक साथीच्या आजाराला न घाबरता समोरी गेल्या आणि आपली ड्यूटी कत्त्वर्याने पार पाडली बलकी याहून अधिक म्हणजे समाज सेवा केली.
 
स्मशान.. हा शब्द ऐकून देखील अंगावर शहारे येतात, वैराग्य वाटू लागतं, भिती जाणवते.. परंतू हे जीवनाचे यथार्थ आहे हे, ज्याचा सामना त्या व्यक्तीला करावाच लागतो ज्याने जन्म घेतला आहे... भारतीय संस्कृतीमध्ये या स्थळापासून स्त्रियांना त्यांच्या नाजुक मन असल्याचे कारण देऊन दूर ठेवलं जातं. परंतू कालांतराने स्त्रियांनी या परंपरा मोडल्या असून आता अशा स्त्रिया देखील आहे ज्यांनी स्मशानात जाऊन आपल्या नातलगांना अग्नी दिली आहे...
 
अशा परंपरांना आवाहन देणयार्‍यांमध्ये भोपाळच्या हमीदिया रुग्णालयातील कर्मचारी हिराबाई यांचे नाव अती सन्मानपूर्वक घेतलं जातं. त्यांनी माणुसकीची ती इमारत बांधली आहे ज्यापुढे आपण देखील श्रद्धेने नत मस्तक व्हाल....
 
कोरोनाकाळात हिराबाई यांनी न केवळ आपल्या रुग्णालयात ड्यूटी दिली त्यापेक्षाही अधिक म्हणजे जेव्हा कोरोना संक्रमणाच्या भीतीने नातेवाईकांनी आपल्या रक्ताचे संबंध असलेल्या आपल्या माणसांचा साथ सोडून दिला तेव्हा त्यांनी पुढे येऊन अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील केला.
 
51 वर्षीय हिराबाई ज्यांना लोकं हीराबुआ या नावाने देखील हाक मारतात त्या मागील 25 वर्षांपासून निराधार आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहे. हिराबाई मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शासकीय रूग्णालय हमीदिया हॉस्पिटलच्या मंदिराजवळ जमा होणार्‍या लोकांसाठी एक उमेदाची किरण आहे जे कोणत्याही कारणामुळे आपल्या नातेवाइकांचा अंत्यसंस्कार करण्यास अक्षम असतात.
 
हीराबुआ आतापर्यंत अशा तीन हजार लोकांवर अंत्यसंस्कार करून चुकल्या आहेत. वेबदुनियाशी चर्चा करताना हिराबाई सांगतात की त्या आपलं हे काम नारायण सेवा समजतात. असे गरीब आणि असमर्थ लोक जे आपल्या नातेवाइकांचे अंत्यसंस्कार करण्यात सक्षम नसतात त्यांची मदत करतात. त्यांना आपल्या या कार्यामुळे आत्मिक संतुष्टी प्राप्त होते. 
 
‘वेबदुनिया’ सोबत बोलताना हीराबुआ आपल्या प्रवासाबद्दल सांगतात की मागील 25 वर्षांपूर्वी एक बुजुर्ग दलित महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर बुजुर्ग महिला तिची मदत मागण्यासाठी आली तेव्हा त्यांनी वर्गणी गोळा करून त्या महिलेच्या मुलावर अंत्यसंस्कार केले.
 
कोरोना साथीच्या आजारात आणि लॉकडाउन दरम्यान देखील हीराबुआ आपलं काम करत होत्या. त्यांना कधीच आपल्या कामाबाबद भीती वाटली नाही. कोव्हिड काळात रुग्णालयात आजारी लोकांची सेवा करण्यासह त्यांनी आपलं समाज सेवा सुरू ठेवली. संपूर्ण लॉकडाउन दरम्यान त्या स्वत: एकट्याने मृतदेह स्मशानात घेऊन गेल्या. 
 
तसेच महिला म्हणून स्मशानात जाऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार्‍या आवाहनांबद्दल हीराबुआ म्हणतात की 21 व्या शतकातील लोक असा विचार करतात यावर विश्वास बसत नाही. आपल्या कामात त्यांना कधीच कुटुंबाची साथ मिळाली नाही, त्यांचे पतीदेखील कधी सोबत उभे राहिले नाही. 
 
‘वेबदुनिया’शी चर्चा करताना आपल्या संघर्षाची कहाणी आठवत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की त्यांच्या कामात त्यांच्या एकुलत्या एक मुलाने साथ दिली. त्या सांगतात की लहानपणी त्यांचा मुलगा त्यांना मदत म्हणून लाकूड आणून देत असे. आज तोच मुलगा मोठा झाला असून त्यांना मदत करत आहे.