शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (09:00 IST)

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष 2021 : आपल्या माता, बहिणीला हे गिफ्ट द्या नातं बळकट होईल.

आज समाजात  पुरुषांच्या योगदाना प्रमाणे स्त्रीचे देखील योगदान आहे. परंतु स्त्रियांना पुरुषांसम अधिकार नाही. म्हणूनच महिलांना आदर देण्यासाठी 8 मार्च रोजी महिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिलेच्या प्रति आपले आदर, प्रेम दर्शवतात. आपण हा दिन त्यांच्या साठी खास करू शकतो. त्यासाठी आपण त्यांना या पैकी काही गिफ्ट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.कोणते गिफ्ट देऊ शकता. 
 
* फोटो फ्रेम ते कार्ड- 
आजच्या स्त्रिया कामकाजी आहे. त्या ऑफिसात जातात. जर आपली आई किंवा बहीण देखील ऑफिसात जात असेल तर तिला एक चांगले फोटो फ्रेम देऊ शकता. ही फ्रेम त्या आपल्या डेस्कवर ठेवू शकतात. किंवा लहान कार्ड देखील देऊ शकता. लॅपटॉप बॅग देखील चांगला पर्याय असू शकतो. 
 
* ड्रेस किंवा मेकअप किट -
या दिनी आपण आई,बहीण, मैत्रिणी किंवा जोडीदाराला एक चांगला ड्रेस,साडी किंवा मेकअप किट देखील देऊ शकता. हे मिळाल्यावर त्या आनंदी होतील.
 
* दागिने-
स्त्रियांना दागिन्यांची खूप आवड असते अशा परिस्थितीत आपण त्यांना आवडीचे दागिने भेट वस्तू म्हणून देऊ शकता. इअर रिंग,ब्रेसलेट हार, काहीही भेट म्हणून देऊ शकता. 
 
* आवडीची डिश घरी बनवा- 
आपण त्या खास दिनी त्यांच्या आवडीची डिश बनवू शकता किंवा बाहेर खाण्यासाठी नेऊ शकता. 
अशा या काही त्यांना आवडणाऱ्या गोष्टींना करून आपण त्यांच्या साठी आपल्या भावना दर्शवू शकतात.आणि त्यांच्या प्रति आदर दाखवू शकता.