शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 मार्च 2021 (15:01 IST)

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात 
 
नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी
 
जिथे नारीची पूजा होते तेथे देवता वास्तव्यास असतात.
 
तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी
तू तर आहेस रणरागिणी झांशीची राणी.
 
जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो, 
जो आईचा अपमान करतो, देवाचा अपमान करतो 
आणि जो देवाचा अपमान होतो, 
त्याचा विनाश निश्चित आहे.
 
सशक्त नारी घडवेल सशक्त समाज.
 
स्त्रियांना दिला मान तरच वाढेल देशाची शान
 
स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे
 
मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश, फक्त संधी मिळायचा अवकाश.
 
तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती  शक्तीशाली आहे 
 
नारी तु महान, विश्वाची आहेस शान.
 
नारीत शक्ती भारी तिला नका समजू बिचारी
 
स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती आहे.
 
स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे 
 
जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते
 
एखाद्या कठोर आणि दुराचारी व्यवहाराला प्रेम आणि मायेने बदलण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे