मंगळवार, 5 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: शनिवार, 7 मार्च 2020 (13:05 IST)

नोकरी सोडून ग्राहकसेवा

उत्तम पध्दतीने सुरु असलेली कॉर्पोरेटमधली नोकरी, दर वर्षी कमी का असेना पण हमखास मिळणारी पगारवाढ, एसी केबिन असं सगळं कोणी सहजासहजी सोडणार नाही. शिवाय अशी मस्त नोकरी सोडून कोणी फोन आला की पळा, उन्हातून फिरा, अशी नोकरी कोण करेल. पण सुरतच्या एका 37 वर्षीय महिलेने हे काम मोठ्या आनंदाने स्वीकारले आहे. महिला आता पुरुषांच्या तुलनेत कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत मग ते शिक्षण असो किंवा लढणे. कॉर्पोरेटमध्ये तर अनेक महिलांनी सिध्द केले आहे. यामध्ये पेप्सिकोच्या इंदिरा नूवी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पण वाहन चालवणे अर्थात ड्राव्हिंग हे असे क्षेत्र आहे की सहसा महिला त्याच्या वाटेला जात नाहीत. किंवा ड्राव्हिंग हे महिलांचे काम नाही, महिला ड्राव्हिंग नीट करत नाहीत असे अनेकदा बोलले जाते. पण हा समज खोटा ठरवला आहे सुरतच्या 37 वर्षांच हर्षिका पांड्ये या महिलेने. हर्षिकाने महिलांबद्दल असणारे आपल्या समाजातले अनेक गैरसमज खोटे ठरवले आहेत. अलीकडच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होताना दिसत आहेत. 
 
हर्षिका पांड्ये यांनी फक्त पुरुषी गैरसमज खोटे ठरवले असे नाही तर महिलांच्याबद्दल एक सकारात्मक भूमिका घ्यायला, विचार करायला सुरतच्या समाजाला भाग पाडले. सुरतला राहणार्‍या हर्षिका पांड्ये यांनी थोडी थोडकी नाही तर थेट नऊ वर्ष कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या हर्षिका यांना नेहमी काही वेगळे करावे असे वाटत होते. यासाठी त्यांनी सुखाने सुरु असलेली कॉर्पोरेटची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हर्षिता पांड्ये या जगातील नागरी वाहतुकीची सेवा पुरवणार्‍या सगळ्यात मोठ्या 'ओला' या कंपनीसोबत काम करत आहेत. ओला कंपनीने जेव्हा बाईकवरून ग्राहकांना सोडण्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला. 'ओला कंपनीच्या बाईक ग्राहक सेवेत काम केल्यामुळे मोठा आत्मविश्वास मिळाला. इतकेच नाही तर लोकांनी मान-सन्मान सुध्दा दिला.' असे हर्षिता पांड्ये आवर्जून सांगतात. 
 
हर्षिता या घरात एकमात्र पैसे कमावणार्‍या नाहीत. तर त्या घरच्यांना सगळ्या प्रकारची मदतसुध्दा करतात. बाईक प्रवासी सेवेमुळे पैसे मिळतातच, पण घराला पुरेसा हातभार लावल्याचं समाधान असल्यातेही त्या सांगतात. आपले बरेचसे ग्राहक हे विद्यार्थी असतात. ज्यांना वेळेत घरी किंवा कॉलेजला पोहोचाचे असतं. या कामामुळे समाधान मिळते आणि पैसासुध्दा असे हर्षिता सांगतात. हर्षिता पांड्ये यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा.