शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2017 (20:31 IST)

#HappyMothersDay

" आई "
 
आई साठी काय लिहू 
 
आई साठी कसे लिहू 
 
आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे 
 
आई वरती लिहिण्यैतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे 
 
जीवन  हे शेत तर आई म्हणजे विहिर 
 
जीवन  हे नौका तर आई म्हणजे तीर 
 
जीवन  हे शाळा तर आई म्हणजे पाटी 
 
जीवन  हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी 
 
आई तू उन्हामधली सावली 
 
आई तू पावसातली छत्री 
 
आई तू थंडीतली शाल 
 
आता यावीत दुःखे खुशाल 
 
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस 
 
आई म्हणजे अंगनातील पवित्र तुळस 
 
आई म्हणजे भजनात गुनगुनावी अशी संतवाणी 
 
आई म्हणजे वाळवंटात प्याव अस थंडगार पाणी 
 
आई म्हणजे  आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाली 
 
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.
.
"आई"..."आई"..."आई"...असते...
 
देऊळ नसते...
 
देव नसते...
 
दुधावरली साय नसते...
 
फुल नसते...
 
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
 
अथांग अथांग सागर नसते...
 
"आई"...म्हणजे नक्की काय...?
 
कोणीही सांगू शकणार नाही...
 
पण तरीही मला वाटते...
 
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
 
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
 
असा आत्मविश्वास देणारी...
 
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
 
"आई"..."आईच"...असते...!!!!