मातृदिना निमित्ताने : वात्सल्य पृथ्वीवर आई मुळेच नांदते
आई चे गोडवे गायिले नाही म्हणून काय झालं?
तिचं आयुष्यातलं महत्व कमी का झालं?
स्त्रीच असते सृजनशील, देते जन्म भविष्यास,
आई ती होते म्हणून महत्व येतं वर्तमानासं,
असो किडामुंगी की प्राणिमात्रअसोत ,
आई ही असते आई, त्यानं तिची महती कमी नाही होत,
वात्सल्य पृथ्वीवर आई मुळेच नांदते,
म्हणून च तिची कुणाशी सर होत नसते!!
...अश्विनी थत्ते