शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (10:20 IST)

मुंबईत 35 वर्षीय डॉक्टर करोनाबाधित

मुंबई महापालिकेची समोर एक नव आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. कारण दोन दिवसात धारावीमध्ये तीन करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. आणि आता एका 35 वर्षीय डॉक्टर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.
 
मुंबई महापालिकेच्या 52 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं गुरुवारी निष्पन्न झालं होतं. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी असून, धारावीत तो कर्तव्यावर होता. या घटनेनंतर शुक्रवारी धारावीत आणखी एक करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. एका 35 वर्षीय डॉक्टरला करोना झाल्याचं समोर आलं. हे कळल्यावर डॉक्टरच्या कुटुंबीयांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. 
 
दरम्यान, करोनाग्रस्त डॉक्टर राहत असलेली बिल्डिंग सील करण्यात आली असून डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.