1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. 400 constructions in Garibnagar in Bandra are razed to the ground

वांद्रेतील गरीबनगरात 400 बांधकामे जमीनदोस्त

मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या 'गरीबनगर' भागात पश्चिम रेल्वेने न्यायालयाच्या आदेशानुसार अत्यंत मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईअंतर्गत रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेली सुमारे ४०० अनधिकृत बांधकामे (झोपड्या) जमीनदोस्त करण्यात येत आहे. १९ मे पासून सुरू झालेली ही धडक मोहीम २३ मे पर्यंत चालणार आहे.  अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील गरीबनगरात ४०० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे.  पश्चिम रेल्वे प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. सुमारे ४०० ते ५०० अनधिकृत झोपड्या, ३-४ मजली बांधकामे आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. यात काही अवैध धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. रेल्वे रुळालगतच्या जागेवर सुमारे ५२०० चौरस मीटर अतिक्रमण होते. ही जागा वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी, नवीन रेल्वे लाईन्स, स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेगळ्या व्यवस्थेसाठी आणि एकूण रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी वापरली जाणार आहे.
 
तसेच ही मोहीम १९ मे २०२६ पासून सुरू झाली आणि ५ दिवस चालणार होती. कारवाईदरम्यान तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही जणांना अटकही झाली.  
तसेच वांद्रे स्थानक परिसरातील या अतिक्रमणाबाबत गेल्या ९ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू होता.  रेल्वेच्या मालकीची सुमारे ५,२०० चौरस मीटर जागा या अनधिकृत ४ ते ५ मजली झोपड्यांनी व्यापली होती, जी आता मोकळी केली जात आहे.२०१७ आणि २०२१ च्या सर्वेक्षणानुसार, येथील एकूण ५०० झोपड्यांपैकी केवळ १०० झोपड्या अधिकृत (पात्र) आढळल्या असून, त्यांचे शासनातर्फे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित ४०० अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जात आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
भारतीय हवामान विभागाने 'या' 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला