मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:20 IST)

5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉकएक्सप्रेस आणि माल गाड्या रद्द

मुंबईत मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि माल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या दिवशी धावणार नाहीत.
 
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6 व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत.
 
कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट (जलगद लोकल) लोकल गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर डायव्हर्ट केल्या जाणार आहेत.