1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. 8 people died in a terrible accident on Kalyan Highway

कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील कल्याण कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलाजवळ हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. इको गाडी आणि एका वेगाने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी जोरात होती की इको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात गाडीतील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भीषण अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली. प्राथमिक अंदाजानुसार, ओव्हरटेकिंगच्या नादात किंवा चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा. मात्र, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच अपघातात मृत पावलेले आठही प्रवासी नेमके कुठले आहे याची माहिती आजून समोर आलेली नाही. पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
अल्पवयीन मेहुणीला घेऊन पळ काढत होता मेहुणा; पाठलाग करणाऱ्या नातेवाईकांच्या दुचाकीला धडक दिली, ३ जणांचा मृत्यू