मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (12:02 IST)

मुंबईत 4 मजली इमारत काहीच सेकंदात कोसळली

नवी मुंबईत कोपऱखेरणेच्या बोनकोडे गावातील शिवाजी नगर परिसरात असलेली साई प्रसाद नावाची चार मजली इमारत अवघ्या काही सेंकदात कोसळली . या मध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात आले. ही इमारत 25 वर्ष जुनी असून धोकादायक असून या मध्ये 40 कुटुंब वास्तव्यास होते. 
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्यातून एकाला वाचविण्यात यश आले आहे. तर एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. 
 
Edited By - Priya Dixit