गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (09:32 IST)

अटल सेतूवर चौथी आत्महत्या! 40 वर्षीय बँक मॅनेजरची समुद्रात उडी घेत आत्महत्या

death
अटल सेतू पुलावरून 40 वर्षीय बँक मॅनेजरने उडी मारून आत्महत्या केली आहे, पुलावरून ही आता चौथी आत्महत्या समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शोधमोहीम सुरू केली.
 
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 9:57 च्या सुमारास 40 वर्षीय बँक मॅनेजरने आपली एसयूव्ही पुलावर उभी केली आणि समुद्रात उडी मारली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांनी सांगितले की, या घटनेची माहिती वाहतूक विभागाकडून मिळाली, त्यानंतर पोलीस आणि किनारी सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
 
पोलिसांनी घटनास्थळी उभ्या असलेल्या कारची झडती घेतली, त्यावरून असे दिसून आले की सुशांत चक्रवर्ती त्याची पत्नी आणि मुलीसोबत मुंबईच्या परळ भागात राहत होता. तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रवर्ती यांना कामाचा प्रचंड ताण येत होता, त्यांच्या पत्नीनेही याला दुजोरा दिला आहे. रस्त्याने जाणाऱ्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
 
अटल सेतू येथून आत्महत्येची ही चौथी घटना असल्याने पुलावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटल सेतू पुलावरील आत्महत्यांच्या वाढत्या संख्येने प्रशासन चिंतेत पडले असून, पुलावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी केली जात आहे. 

Edited By- Dhanashri Naik