शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:24 IST)

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एक धक्कादायक घटना घडली होती. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.
 
सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यामधील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली होती. या प्रकरणी देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झूंज अखेरी ठरली. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी दुपारी बाराच्या सुमारास सुभाष देशमुख यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.