मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:16 IST)

मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार

vidya chvhan
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. कंबोज यांनी ट्विट करून “जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली”असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. अमित शाह यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती.
 
दरम्यान, मोहित कंबोज यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच विद्या चव्हाण यांना जय श्रीराम, असे ट्विट केले होते. परंतु, यातून पूर्ण अर्थ स्पष्ट होत नव्हता. परंतु, आज गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कंबोज यांनी दुसरे ट्विट करून जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.