म्हणून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या विविध भागात दौरा करत विकास कामांचा शुभारंभ करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतरही लाऊड स्पीकर वरून भाषण केलं होतं. आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात या संबधी तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळेच आनंद कस्तुरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्यात दौऱ्यावर आले होते तेव्हा औरंगाबाद मध्ये रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु असायचे, आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा विरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद कस्तुरे यांनी केली आहे. मुख्यनामंत्री शिंदे यांनी औरंगाबाद, पैठण, वैजापूर आणि सिल्लोड मध्ये सभा घेतल्या.