एकादशीला मृत्यू येण्यासाठी आजींचे टोकाचे पाऊल
औरंगाबाद येथे शिवाजीनगर भागात एकाआजीने एकादशीला मृत्यू यावे या साठी टोकाचे पाऊल उचलले आहे. एकादशीलाच मृत्यू यावा या साठी वृद्ध आजींनी घरातील सर्व मंडळी झोपले असताना रात्री उशिरा स्वतःच्या अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केली. कावेरी भास्कर भोसले असे या आजींचे नाव आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून सततच्या आजाराने कंटाळल्या होत्या. त्यांना हृदयाचे आजार होते आणि ढगाळ वातावरणात त्यांना त्रास व्हायचा. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कावेरी भोसले यांना अध्यात्मिकतेची आवड होती आणि त्यांना एकादशीलाच मोक्ष मिळावे अशी त्यांची इच्छा होती, त्यांनी अनेकदा आपली ही इच्छा आपल्या कुटुंबियांना बोलून देखील दाखवली होती.
त्या गेल्या काही वर्षांपासून सततच्या आजाराला कंटाळलेल्या होत्या त्यांना ढगाळ वातावरण आले की त्रास व्हायचा. रविवारी कामिका एकादशी च्या दिवशी कावेरी भोसले यांनी हरिपाठ केला नंतर घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यावर घरातील वरच्या मजल्यावर जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हाताला सुती कापड गुंडाळून त्यावर गावरान तूप ओतले नंतर अंगालाही तूप लावले आणि नंतर पेटवुन घेतले. तूप लावल्यामुळे आगीने पेट घेतला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.