मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (17:04 IST)

कल्याणमध्ये चालत्या दुचाकीने पेट घेतला, सुदैवाने दुचाकीस्वार बचावला

A moving bike caught fire in Kalyan
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या बातम्या येत आहे. कल्याणमध्ये धावत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना आज कल्याणच्या सर्वोदय मॉल परिसरात घडली.सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून गाडीवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. 
कल्याणहून डोंबिवलीकडे दुचाकीस्वार जात असताना त्याच्या गाडीनं पेट घेतला. त्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उडी घेतली. अचानक धावत्या गाडीने पेट घेतल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. तातडीनं अग्निशमन दलाला बोलवण्यात आले आणि त्यांनी जळत्या दुचाकीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जन हानी झाली नाही. 
 
Edited By - Priya Dixit