बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (15:31 IST)

मुंबईत जमावाकडून तरुणाला बेदम मारहाण ,आईने वाचविण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेकिंगचा वाद बनले कारण

mumbai road rage
Mumbai road rage murder :मुंबईतील गोरेगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओव्हरटेकिंगच्या वादातून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. यावेळी मृताची आई मुलाला वाचवण्यासाठी अंगावर पडली. वडील हात जोडून मुलाच्या जीवाची भीक मागत राहिले, पण कोणी ऐकले नाही.
 
blockquote class="twitter-tweet" data-media-max-width="560">

बेटे को बचाने के लिए ऊपर लेट गई थी मां...बाप मांगता रहा माफी !!#मुंबई में ओवरटेक को लेकर विवाद...भीड़ ने पीट-पीटकर की हत्या !!

मृतक का नाम आकाश माइन बताया जा रहा है !!#ViralVideo #Mumbai #MobLynching #TrendingNews pic.twitter.com/gzsbVRfg1A

— MANOJ SHARMA LUCKNOW UP???????????????????????? (@ManojSh28986262) October 14, 2024 <
सदर घटना मुंबईच्या पश्चिम उपनगर मालाड पूर्व येथे घडली आहे. मालाड पूर्व दिंडोशी भागात जिथे ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणानंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. आकाश माईन असे या तरुणाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी तरुणाचे पालक देखील तिथे उपस्थित होते. हा तरुण बाईकवरून जात असताना एका ऑटो चालकाने त्याला ओव्हरटेक केले या वरून आकाशचे ऑटोचालकाशी वाद झाले. ऑटोचालकाने त्याच्या मित्रांनी आणि  स्थानिक विक्रेतांनी त्याला मारहाण करायला सुरु केले. त्याला वाचवण्यासाठी आकाशची आई त्याच्या अंगावर पडली. वडील मात्र जमावाला करबद्ध होऊन विनवणी करत असताना देखील त्यांचे कोणीही ऐकले नाही. 

जमावाने आकाशला बेदम मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.आईने मुलाचा मृतदेह पाहतातच टाहो फोडला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ धक्कादायक आहे. सदर घटनेमुळे मुंबई सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहे. 
Edited By - Priya Dixit