संबंधित माहिती
- नांदेडच्या कोचिंग सेंटर मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, संतप्त लोकांनी कोचिंग सेंटर तोडले
- भांडुप मध्ये मैत्रिणीने बोलणे बंद केल्याने चाकूने हल्ला करत आत्महत्याचा प्रयत्न
- शिवसेनेच्या 'बुरखा राजकारणा'वर भाजप नाराज,विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला
- मुंबईला लवकरच मिळणार 7वी वंदे भारत ट्रेन
- लालबागच्या राजाच्या दरबारात सर्व सामान्यांशी असभ्य वर्तन, व्हिडिओ व्हायरल
ठाण्यात 7 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक
महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या प्रकरण कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. बदलापूर नंतर आता ठाण्यातील उल्हासनगर शाळेत देखील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
ठाणे जिल्ह्यातील 7 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शालेय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी शिक्षक विद्यालयाचा क्रीडा शिक्षक असून त्याने शाळेच्या आवारात मुलीचा विनयभंग केला.मला मिठी मार, माझी पप्पी घे नाही तर तुला मारेन अशी धमकी मुलीला दिली. तिच्या गालावर चुंबन घेतले. मुलीने घरी गेल्यावर पालकांना ही माहिती दिली. पालकांनी गुरुवारी पोलिसांशी संपर्क साधत आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण पॉस्कोच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
Edited by - Priya Dixit
