मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (16:32 IST)

चक्रीवादळाची स्थिती जाणून घेण्यासाठी पोहोचले अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात

तौक्ते वादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले तीन दिवस प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शिवाय या वादळाने कोणतीही जिवितहानी होऊ नये यासाठी सर्वपध्दतीने सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सगळी माहिती घेत आहेत. कोकणातील काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीकेसीतील कोविड सेंटर जे तात्पुरते उभारण्यात आले होते. त्यातील १९३ रुग्णांना मनपाच्या विविध हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जे रुग्ण आयसीयूमध्ये होते त्यांनाही व्यवस्थित हलविण्यात आले आहे. जिवितहानी होणार नाही यादृष्टीने ही दक्षता घेण्यात आली आहे. अजून धोका टळलेला नाही लोकांनी सतर्क राहावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.