मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (17:09 IST)

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल

Amit Raj Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच, एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
 
अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आली आहे.
 
दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत होता, अशी माहिती समोर आली आहे. तर, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्यांना आलेला ताप हा वातावरणातील बदलांमुळे असू शकतो. परंतु, सध्याची करोना परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.