1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (11:09 IST)

बंदुकीचा धाक दाखवत सोन लुटण्याचा प्रयत्न

Attempt to rob gold at gunpoint बंदुकीचा धाक दाखवत सोन लुटण्याचा प्रयत्न
बनावटी बंदुकीचा धाक दाखवत विरार मध्ये एका ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र सराफच्या धाडसामुळे महिलेचा दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना विरार पश्चिम येथे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. देवनारायण ज्वेलर्स या दुकानात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एक महिला बुरखा घालून आली आणि तब्बल दोन तास ही  महिला लग्नासाठी दागिने बघत होती. त्यावेळी दुकानाचे मालक देवलाल गुजर हे एकटेच दुकानात होते. नंतर सदर महिलेने स्वतःच्या जवळ लपवून ठेवलेली बंदूक काढली आणि बंदुकीचा धाक दाखवत दुकानाच्या मालकाला दागिने व रोख देण्याची मागणी केली.

धाडसाने देवलाल यांनी महिलेला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला मूळची बार्बरा येथील असून मीरारोड येथे एका बार मध्ये काम करते. पोलिसांनी तिच्या कडून बनावटी बंदूक नसून ते लायटर असे. जप्त करण्यात आले आहे. पोलीस महिलेची चौकशी करत आहे.