शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (11:04 IST)

चांगली बातमी ! बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस

मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायक होणार आहे. येत्या वर्षभरात बेस्टच्या ताफ्यात आणखीन 2100 इलेक्ट्रिक बस येणार असल्याची माहिती ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीने दिली. कंपनी सोबत बेस्ट चे 3,675 कोटी रुपयांचा करार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. बेस्ट कडून मोठी ऑर्डर मिळाल्याने आनंद होत असल्याचे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही.प्रदीप यांनी सांगितले. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वात मोठी इलेक्टिक बस फ्लीट चालवणे ही  फार अभिमानाची गोष्ट आहे. 
 
त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. 12 वर्षाच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट ऑपेक्स मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बस घेणार .
 
इलेक्ट्रिक मोबेलिटीमध्ये अग्रगण्य असलेली कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार 12 मीटर एसी बसेसचा पुरवठा करणार आहे. या कंपनीच्या मुंबईत सध्या 40 इलेक्टिक बसेस धावत आहे. पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस अतिशय उत्तम सेवा बजावत आहेत