रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (14:19 IST)

एका बाईकवर 6 जणांचा प्रवास

वाहतुकीचे नियम पाळावेत असं म्हणतात. दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी बसू नये. हेलमेट वापरावे. अशा सूचना वाहतूक विभागाकडून दिल्या जातात. वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईत वाहतूक नियमांना धता  देत एका बाईकवर सहाजण असून ते स्टंट करत असल्याचा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ रमनदीप सिंह होरा नावाच्या एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. रमनदीपने मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांना टॅग करून या बाइकचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दखल घेत या तरुणांना शोधण्याचे काम सुरु केलं आहे.