मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (16:00 IST)

मोठा प्रकल्प :महाराष्ट्रातील पहिले नौदल संग्रहालय कल्याणमध्ये बांधले जाणार

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात नौदल संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील हे पहिले नौदल संग्रहालय असेल. त्याचा आकार जहाजासारखा असेल, ज्यामध्ये नौदलाचा इतिहास चित्रित केला जाईल.
 
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत गुरुवारी या मोठ्या प्रकल्पाची पायाभरणी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल.