शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:04 IST)

पेडणेकर उत्तर देतांना म्हणाल्या हिंदुत्व काय असतं ते आम्हाला शिकवू नका

भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला असा विरोध होणे दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्गीतेच पठण करायचे नाही, मग फतवा-ए-आलमगिरीचे पठण झाले पाहिजे का? असा सवाल केला होता. याचे उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या का, हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणल जातंय. हिंदुत्व काय असतं ते आम्हाला शिकवू नका. हिंदुत्व हे सारखं तोंडाने बोंबलून सांगण्यासारखे नाही.
 
‘हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणतायत. गीता ही सर्वोच्च आहे. ज्यावेळेला मी मधल्या पॅसेजमध्ये होते, त्यावेळेला गीता कोळी माझ्याकडे धावत धावत मागे आल्या. गीता घ्या, गीता घ्या, मी गीता आणली आहे, असे म्हणाल्या. अर्थातच त्या गीतेच उच्च स्थान आमच्या हृदयात नव्हे तर आमच्या कर्मात आहे. म्हणून मी त्या मधल्या पॅसेजमध्ये नमस्कार केला आणि त्यानंतर ग्रंथ घरी घेऊन गेले. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव अद्याप महानगरपालिकेच्या पटलावर नसतानाही चर्चा करणे योग्य नाही. याचे राजकारण करण्यासाठी लहान मुलांनाही सोडले जात नाही. या राजकारणातून तुम्ही नक्की तरुण पिढीला काय संस्कार देताय हे कळतंय. त्यामुळे या गोष्टीवर यानंतर मी बोलणार नाही. प्रस्तावाच आला नाही, फक्त पत्र दिलं, फोटो काढले आणि व्हायरल केले, अशा पद्धतीने चर्चेत राहतायत,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.