बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (09:47 IST)

गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपाने मुंबईतून ५०० कोटी रुपये पाठविले

सध्या अंतर्गत कलहात अडकलेले राजस्थानातील काँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपाने आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून ५०० कोटी रुपये पाठवले आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही ती राज्यं अस्थिर करण्याचा पद्धतशीर अजेंडा राबवत आहे अशीही टीका सचिन सावंत यांनी केली आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
 
त्यामुळे आता प्रकरणात आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. कथित ऑडिओ टेप समोर आल्याच आहेत. आता सचिन सावंत यांनी हा नवा आरोप करुन खळबळ माजवून दिली आहे.