गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (12:55 IST)

मुंबईमध्ये विष प्राशन करून मांजराचा मृत्यू, गुन्हा दाखल

मुंबई मधील दादर परिसरामध्ये एका मांजराला विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोपांमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. 
 
मांजराच्या मालकीणबाईने 26 जुलै ला आपल्या घराच्या प्रवेशव्दारावर पाळीव मांजराला बेशुद्ध अवस्थेत पहिले. मांजराच्या तोंडातून काळा तरल पदार्थ बाहेर येत होता. महिलेने मांजराला परेलच्या पशु चिकिस्ता रुग्णालयात नेले. पण दुसऱ्या दिवशी मांजराचा मृत्यू झाला. महिलेने सोमवारी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला व दावा केला की कोणीतरी तिच्या मांजराला विष पाजले. भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.