1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (11:32 IST)

डोंबिवली मध्ये नोकर चोर निघाला असून 15 लाखांहून अधिक किमतीचा माल चोरला, 3 जणांना अटक

Maharashtra
महाराष्ट्रातील ठाण्यातील डोंबिवली मध्ये आश्यर्यचकित करणारी एक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानेच केली मोठी चोरी. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली मध्ये एका नोकराने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन किमती सामान चोरला आहे. 
 
ठाणे पोलिसांच्या एका अधिकारींनी सांगितले की, ही घटना डोंबिवली मधील आहे. जिथे घरातून 15 लाख रुपये किमतीचा सामान चोरी केल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
घरात काम करणाऱ्या नोकराने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन मालकाच्या घरात चोरी केली. किंमती घड्याळ भारतीय आणि विदेशी चलन सोबत अनेक किमती सामान चोरला. ज्यांची किंमत 15.52 लाख रुपये आहे. 
 
पोलिसांनी हे प्रकरण शोधून काढण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली. तसेच सूचना मिळवत व आरोपींपर्यंत पोहचले. व आरोपींना बंगलोर आणि मुंबई मधून अटक केली. त्यामध्ये एक आरोपी 27 वर्षाचा आहे तर बाकी दोन 45 वर्षाचे आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की या चोरीतीलतील मुख्य आरोपी घराचा नोकर फरार आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत आहे.