शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (16:05 IST)

गोदरेज कम्युनिटी हॉलमध्ये २५ इंटेन्सिव्ह केअर युनिटसह ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर

Center for 75 Oxygen Beds
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या व घाटकोपर ( पूर्व) येथील नगरसेविका राखीताई जाधव यांनी अथक प्रयत्न करून गोदरेज कंपनी आणि पालिकेच्या सहकार्यातून विक्रोळी (पूर्व) येथील गोदरेज कम्युनिटी हॉलमध्ये २५ इंटेन्सिव्ह केअर युनिटसह (आयसीयू) ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर निर्माण केले आहे.
 
या सेंटरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी होणार आहे.
 
या सेंटरमध्ये, सौम्य लक्षणांसह आजार बळावलेल्या रुग्णांवरही तातडीचे उपचार केले जातील. आपल्या विभागातील नागरिकांसाठी याठिकाणी डॉक्टर्स, परिचारक, वैद्यकीय कर्मचारी यांची फळी उभारून अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. या सुविधांचा लाभ घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांचे योग्य सहकार्य अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हेदेखील नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी कायम तत्पर असतील, असे राखी जाधव यांनी म्हटले आहे.