1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:43 IST)

साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल

Chargesheet filed in Sakinaka rape case Maharashtra News Mumbai Marathi News Webdunia Marathi
मुंबईतल्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणी आता ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे.त्या कंपनीचा वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं होतं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं होतं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते.तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती.त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं.डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते.चौकीदाराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.