गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (18:15 IST)

भिवंडित संतापजनक घटना : पतीने पेटवले पत्नीला

भिवंडीतील एका संतापजनक घटनेची एक घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी  नवर्‍याला पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फिरोज याने आपली पत्नी रुकसानाकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र तिने  पैसे देण्यास नकार‍ दिला  त्यामुळे फिरोजने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी रुकसाना हिने तत्काळ आग विझवत घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.