शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (16:26 IST)

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुंबईसह ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला पाठवला आहे. मुंबई ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सुमारे २५ पोलीस अधिकाऱ्याची नावे असून या सर्वांच्या निलंबना प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
 
मुंबईत मरीन ड्राइव्ह, आंबोली, ठाण्यात ठाणे नगर, कोपरी आणि नौपाडा अश्या एकूण 5 पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ठाणे मुंबईतील पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तसेच एसीपी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये गुन्हे दाखल झालेल्या तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे
 
तसेच पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकरी यांच्या मुंबई,ठाणे बाहेर तसेच साईड ब्रँचला बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात एक महिला अधिकारी यांचा देखील समावेश आहे.