शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (10:15 IST)

मराठी माणूस हा काही एका पक्षाचा कॉपी राईट नाही' - नितेश राणे

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे.शिवसेनेला 32 वर्षं सत्ता दिली आम्हाला 5 वर्ष द्या,असं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
मराठी माणसाच्या मुद्यावरुन त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मराठी माणूस हा काही एका पक्षाचा कॉपी राईट नाही,असं नितेश राणे म्हणाले.मराठी माणसासाठी लढणारा पक्ष होता मग मराठी लोकांना मुंबईपासून दूर वसई,विरार,कल्याण,डोंबिवली याठिकाणी रहायला का जावं लागलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
ते म्हणाले, "शिवसेनेने मराठी माणसांसाठी काय केलं.पाच वर्ष मराठी माणसाने आपला पर्याय बदलावा. 32 वर्ष तुम्ही एकाच पक्षाला संधी दिलीय. ती शिवसेना तशीही आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही."