शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (18:00 IST)

काँग्रेसने ठाणे जिल्ह्यातील 8 सदस्यांचे निलंबन केले

congress
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपल्या पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील 8 सदस्यांचे निलंबन केले. हे निलंबन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे  केले आहे.
पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने शुक्रवारी 8 सदस्यांच्या निलंबनाची माहिती दिली. एका निवेदनात काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे की , पक्षविरोधी कारवायांमुळे या सदस्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. 
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि राज्यातील २८८ जागांपैकी केवळ 16 जागा जिंकता आल्या.महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) ने 20 जागा जिंकल्या, काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP (SP) ने फक्त 10 जागा जिंकल्या
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य ओबीसी युनिटचे उपाध्यक्ष सुरेश पाटील-खेडे यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. 
Edited By - Priya Dixit