शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (19:03 IST)

पोटच्या मुलीला आईनेच 1 लाखाला विकले, मुंबई पोलिसांनी दोन महिलांना अटक केली

baby legs
एक दिवसाच्या मुलीला विकण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळून लावला .या प्रकरणात मुंबई पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली आहे. ही घटना देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मुंबई पोलिसांनी डाव उधळून लावला. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस गुन्हे शाखेला एक दिवसाच्या बाळाच्या विक्री करण्याची माहिती मिळाली होती. या एक दिवसाच्या चिमुकलीला एक लाख रुपयात विकले जात होते. हे देवनार पोलीस ठाण्यात विक्री होण्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून हे डाव उधळले आणि या प्रकरणी दोन महिलांना अटक करून त्यांच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. 
 
Edited  By - Priya Dixit