रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (14:41 IST)

29 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त

drug
मुंबई :- अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबईतील एका ठिकाणाहून 29 कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले आहेत.
 
एमआयडीसी तुर्भे येथील मे. सावला फूड्स अँड कोल्डस्टोअरेज येथे बाहेरील देशातून आयात केलेल्या अन्न पदार्थांचा निकृष्ट दर्जाचा साठा आढळला. इथल्या कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या पेट्यांमध्ये आयातदारांनी विविध देशांमधून मसाले, ड्राय फ्रुट्स, सिरप्स इत्यादी अन्न पदार्थ साठविलेले आढळले.
 
यापैकी 35 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. तर 29 कोटींची साठा जप्त करून पुढील आदेश येईपर्यंत परवानाधारकाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. या वेळी अन्न नमुने घेताना बऱ्याचशा अन्न पदार्थांवर काहीही नमूद नव्हते. सुरक्षा व कायदा 2006 व नियमन 2022 मधील तरतुदीचे उलंघन होत असल्याचे आढळून आले.
 
कामगारांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या लगत अन्नपदार्थांची साठवणूक केल्याचे आढळून आले. तसेच कोल्डस्टोअरेजमध्ये झुरळ, उंदीर यांचा प्रादुर्भाव आढळून आला. या सर्व प्रकारामुळे अन्न पदार्थाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता असते.
Edited by : Ratnadeep Ranshoor