दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीमध्ये सातव्या थरावरून पडून जखमी झालेल्या संदीप दळवी या मुंबईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकानं विलेपार्ले पूर्वेकडीलच बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी सात थर रचले. यावेळी सातव्या थरावरून संदीप दळवी कोसळला असता, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
यानंतर संदीपला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यानं अखेरचा श्वास घेतला.
संदीप दळवी हा 22 वर्षीय तरुण मूळचा विलेपार्ले येथील असून, नुकतंच त्याचं कुटुंब कुर्ल्यात राहायला गेलं होतं.