गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (08:15 IST)

अबब, घरात शिरला अजगर, पोलीस शिपाईने अगदी सहजरित्या त्याला काढले बाहेर

मुंबईमध्ये  घरात शिरलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले आहे.थर्टी फस्टचे जोरदार सेलिब्रेशन सुरु असताना धारावीत अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. या अजगराला मुंबई पोलीस दलात काम करणारे मुरलीधर जाधव या शिपाईने अगदी सहजरित्या बाहेर काढले. 
 
धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे एका व्यक्तीच्या घराच्या पहिल्या माळ्यावर सहा फूट लांबीचा अजगर पकडण्यात आला. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे. यावेळी घरात घुसलेल्या अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.