1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (13:46 IST)

Dog Acid Attack in Mumbai: कुत्र्याला मांजरीपासून दूर ठेवण्यासाठी अॅसिड फेकले

Dog Acid Attack in Mumbai: मुंबईतील मालवणी परिसरात एका भटक्या कुत्र्यावर एका महिलेने अॅसिड फेकले. यामुळे कुत्रा गंभीररित्या जळाला आणि त्याचा एक डोळा निकामी झाला. ही घटना 17 ऑगस्टची आहे.

पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय सबिस्ता अन्सारी हिच्यावर अॅसिड हल्ल्याचा आरोप आहे. ही महिला नेहमी काही मांजरींना खायला घालायची . हा भटका कुत्रा मांजरांचा पाठलाग करायचा हे या महिलेला आवडत नसे. म्हणून या महिलेने कुत्र्यावर अॅसिड  फेकले. जेणे करून तो मांजरीच्या मागे जाऊ नये. 
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 

फुटेज  मध्ये दिसत आहे की , ही  महिला झोपलेल्या कुत्र्याजवळ जाते आणि त्याच्यावर अॅसिड  फेकते. घाबरून हा कुत्रा सैरभर होऊन पळत आहे. आणि वेदनेने विव्हळत आहे. या कुत्र्याचा सांभाळ  करणाऱ्या तुकाराम ने त्याला रडताना आणि घायाळ असलेले पाहून तातडीनं त्याला पशु चिकित्सालयात नेले. 

या घटनेची माहिती मिळताच टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य आणि तिची टीम कुत्र्याला (ब्राउनी) वाचवण्यासाठी पुढे आली. ब्राउनीला जया भट्टाचार्य यांच्या 'थँक यू अर्थ' या एनजीओमध्ये नेण्यात आले, जे गरजू प्राण्यांना वाचवते आणि त्यांच्यावर उपचार करते.

जया भट्टाचार्य यांनी उघड केले की त्यांनी ब्राउनीच्या दुखापतींचे तपशील असलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना दिली.
 
जया भट्टाचार्य म्हणाल्या की, मांजरीला चारा देणारी व्यक्ती दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करते हे धक्कादायक आहे. मालवणी पोलिसांनी सबिस्ता अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी बाळासाहेब तुकाराम भगत यांनी त्यांच्या तक्रारीत ब्राउनीची उपस्थिती आणि सबिस्ता अन्सारी कुत्र्याला ती खायला घालत असलेल्या मांजरींशी संवाद साधताना ती कशी पळवून लावायची याची सविस्तर माहिती दिली.
 
  Edited by - Priya Dixit