गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (08:33 IST)

ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे ते आपल्याला माहित नाही

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या मुलालाही ईडीने ताब्यात घेतलं. या कारवाईच्या वेळी प्रताप सरनाईक हे घरी नव्हते. त्यानंतर सुमारे ८ ते ९ तासांनी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सामनाचं कार्यालय गाठत संजय राऊत यांची भेट घेतली. त्याआधी हे नक्की काय प्रकरण आहे? ईडीने आम्हाला कशाला बोलावलं आहे ? ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे ते आपल्याला माहित नाही असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रीया दिली आहे.