सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (16:07 IST)

विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी शिवसेनेकडून दोन नाव निश्चित

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नाव निश्चित करण्यात आली. यामध्ये शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चि करण्यात आले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे आता यापैकी एका जागेवर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मे पूर्वी या निवडणुका व्हाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असेल.