गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (16:47 IST)

मुंबईत आठवीतील मुलीवर शाळेत बलात्कार

gang rape
मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 13-14 वयोगटातील चार मुलांनी 13 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. मुलीला बीएमसी शाळेच्या वर्गात बंद करून एका मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर आणखी एका विद्यार्थ्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
 
 यावेळी त्याचे दोन मित्र वर्गाबाहेर पहारा देत होते. चारही मुले आणि पीडित मुलगी एकाच वर्गात शिकत होते. हे सर्वजण आठवीच्या वर्गात शिकत होते. घटना मंगळवारची आहे. त्यावेळी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी इतर विद्यार्थी व शिक्षक शाळेच्या हॉलमध्ये होते.
 
दोन मुलांना अटक, रिमांड होममध्ये पाठवले
 दरम्यान, संधी मिळताच या चार मुलांनी विद्यार्थिनीला खोलीत कोंडून तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले. ही बाब मुलीच्या पालकांना कळताच त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
एफआयआर नोंदवण्यासोबतच पोलिसांनी दोन मुलांना अटक केली. त्याच्यावर आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलांना डोंगरी रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे.
Edited by : Smita Joshi