1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (21:55 IST)

आयुक्त सूर्यवंशी यांनी बूस्टर डोस घेतला तरीही झाली कोरोनाची लागण

Even after Commissioner Suryavanshi
कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  याना कोरोनाची लागण झाली आहे. तो होम क्वारंटाईन झाले आहेत.कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आयुक्त सूर्यवंशी यांनी बूस्टर डोस घेतला होता. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका कर्मचाऱ्याना  कोरोनाची लागण झाली आहे. महानगरपालिकेच्या 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.