शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (18:12 IST)

ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर, दोघा मित्रांचा मृत्यू

ताडीच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिमच्या कोपरगावात घडला आहे. सचिन अशोक पाडमुख (22) आणि स्वप्नील बबन चोळखे(30) अशी मयत तरुणांची नावे आहेत. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र अण्णानगर रेल्वे ट्रॅकच्या जवळ असलेल्या एका ताडी विक्री केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले असता. जास्त प्रमाणात ताडी प्यायल्याने त्यांना त्रास होऊ लागला.त्यांच्या छातीवर दाब येऊन त्यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि  त्यांची प्रकृती खालावत गेली असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .त्यापूर्वी ताडी विक्री केंद्राला चालविणारा रवी बथणी पसार झाला होता. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे. ताडीच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला असला तरी ही ताडीचे नमुने तपासासाठी पाठविले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.