बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (10:04 IST)

महिला क्लीन अप मार्शलला हाणामारी , क्लीनअप मार्शल गंभीररित्या जखमी

मुंबईत अंधेरी पश्चिम मध्ये गुरुवारी संध्याकाळी क्लीन अप मार्शल ला मारहाण केल्याची घटना घडली आहे .क्लीन  अप मार्शलने केलेल्या दादागिरी मुळे एका महिलेने संतापून दोन क्लीन अप मार्शला मारहाण केली.
 ही घटना गुरुवारी घडली एक महिला रिक्षा मध्ये मास्क तोंडावरून खाली करून प्रवास करत होती . अचानक बीएमसीच्या दोन क्लीन अप महिलांनी त्या महिलेचे फोटो काढून तिच्या नावाने 200  रुपयांची दंड पावती फाडली. या वरून त्या महिला आणि क्लीन अप मार्शल मध्ये वादावादी सुरु झाली. त्या महिलेने चिडून त्या क्लीनअप माहिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत त्या क्लीन अप मार्शल  गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .या प्रकरणी त्या महिलेच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेणं सुरु आहे