गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)

मुंबईत ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला आग, गाड्या जळून खाक

मुंबईतील पवई साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला गुरुवारी आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सेंटरला आज सकाळच्या सुमारास आग लागली. आग इतकी मोठी आहे की परिसरात धुरांचे मोठे लोट पसरले आहेत. आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. तर, आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्याअसून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
यापूर्वी अलीकडेच मुंबईतील कांदिवली भागातील हंसा हेरिटेज नावाच्या १५ मजली इमारतीच्या १४व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत २ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 8 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाळीसाठी लावण्यात आलेल्या दिव्यांपैकी एक घराच्या परद्याला आग लागल्यानंतर वेगाने संपूर्ण मजल्यावर पसरली.