सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (16:53 IST)

नाल्यात वाहत असलेल्या चिमुकल्या बाळाला मांजरींनी वाचवले

मुंबईत घाटकोपर येथे एका नाल्यात नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून फेकून देण्यात आले होते. पण शेजारच्या मांजरींनी ओरडुन गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले. मांजरींचे ओरडणे काहीतरी वेगळं असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. मांजरींना काहीतरी सांगायचं आहे हे आसपासच्या रहिवाशांच्या लक्षात आलं. ज्या दिशेने मांजरी ओरडत आहेत त्या दिशेला पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण नाल्यात नुकतेच जन्मलेले अर्भक होते. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे.
 
ही माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती.