माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल,अँजिओप्लास्टी झाली
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराच्या त्रासांनंतर प्रकृती खालावल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहे.
त्यांना रुग्णालयातून मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी डिस्चार्ज करण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्यासारखे काहीच नाही. ते लवकरच बरे होऊन घरी जाऊ शकतात. या वेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत होत्या.
या पूर्वी देखील 2014 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांच्या हृदयातील तीन मुख्य धमन्यांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी 8 स्टेण्ट टाकण्यात आले.
Edited By - Priya Dixit